पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.चे चालक आणि वाहक यांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ !
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितच्या (पी.एम्.पी.एम्.एल्.) बसवरील चालक आणि वाहक यांना किरकोळ कारणांमुळे मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या अडीच मासांत मारहाणीच्या ३८ घटना घडल्या आहेत. यामध्ये काही प्राणघातक आक्रमणेही करण्यात आली आहेत. (अशी आक्रमणे करणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई का केली जात नाही ? कारवाईची जरब बसल्यास अशी आक्रमणे करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. – संपादक) अशा प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘पी.एम्.पी.एम्.एल्. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन’कडून पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास कामगारांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे.