कोंढवा (जिल्हा पुणे) येथील अवैध पशूवधगृहावर धाड !
५ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री जप्त !
पुणे – येथील कोंढवा परिसरातील मीठानगरमधील गल्ली क्र. ४२ मधील आकीब कुरेशीच्या अवैध पशूवधगृहावर गोरक्षा दलाच्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धाड टाकून कारवाई केली आहे. धाड टाकताच आरोपी पसार झाले. ही कारवाई १९ मार्चच्या मध्यरात्री २ वाजता करण्यात आली. यात गोरक्षकांनी ५ जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री पोलिसांच्या साहाय्याने हस्तगत केली. मागील ६ मासांत याच पशूवधगृहामध्ये १ सहस्र ४०० ते १ सहस्र ६०० गायी-वासरे यांची कत्तल झाली असून कोंढव्यातील बहुसंख्य ‘बीफ’ दुकानदारांना याच पशूवधगृहातून गोमांस पुरवले जात होते, अशी माहिती गोरक्षकांनी दिली. (महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा असतांना असे प्रकार व्हायला कोंढवा भारतात आहे कि पाकमध्ये ? – संपादक) या प्रकरणी आकीब कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी गोरक्षक श्री. राहुल कदम यांनी तक्रार दिली असून सर्वश्री ऋषिकेश कामथे, अक्षय कांचन, कुणाल रेवडे, ओम मोहोळ, पवन राठोड, निखिल तेलकर, लक्ष्मण राऊत, भरत गदादे आणि विशाल राऊत यांचे सहकार्य लाभले.
गोरक्षकांनी उघड केलेले वास्तव
१. बहुसंख्य मुसलमान भाग असणार्या कोंढव्यातील घरात, पार्किंगमध्ये किंवा अज्ञात ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून प्रतिदिन गायींच्या हाडा-मांसाचा व्यवसाय केला जातो. जोपर्यंत गोरक्षक स्वतःहून माहिती घेऊन पोलीस ठाण्यात जात नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे धाडस पोलीस प्रशासकीय यंत्रणा करत नाही.
२. कोंढव्यात अनधिकृत बीफ दुकानदारांच्या दुकानात सर्रासपणे म्हशींच्या नावाखाली गोमांस विकले जाते पण पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासकीय यंत्रणा कोणतीही या बीफ दुकानदारांवर कारवाई करत नाही.
३. कोंढव्यात वेळोवेळी गोरक्षा दल, महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांकडून कारवाई केली असता कोणत्याही प्रकारची गोहत्या थांबवण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद भारतातील मुसलमान समाजाकडून दिला जात नाही. उलट याला काही स्थानिक लोकप्रतिनिधींचे साहाय्य मिळत आहे.
संपादकीय भूमिकाकोंढव्यासारख्या मुसलमानबहुल भागातील गोवंशियांच्या होणार्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |