केसतोड (गळू) या विकारावर सोपा घरगुती उपचार
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६७
‘कापसाची चकती करून साधारण १ घंटा पाण्यात भिजत घालावी. नंतर ती चकती तशीच उचलून दोन्ही तळहातांच्या मध्ये ठेवून पिळावी. एक कढई गरम करून तिच्यात अर्धा चमचा तूप घालून त्यावर ही चकती परतून घ्यावी. केसतोड किंवा गळू झालेल्या ठिकाणी या कापसाच्या चकतीने शेक देऊन चिंधीच्या साहाय्याने ती चकती केसतोडावर बांधावी. दिवसा बांधलेला कापूस रात्री आणि रात्री बांधलेला दिवसा काढावा (सोडावा) आणि बरे होईपर्यंत पुन्हा याच पद्धतीने बांधावा.
या उपचाराने गळू पिकायचे असल्यास लवकर पिकून फुटते किंवा पिकायचे नसल्यास बसून बरे होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)
♦ आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ♦