गुढीपाडव्याच्या दिवशी हलाल मांसाला विरोध करून झटका मांस खरेदी करा !
-
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु संघटना यांच्याकडून कर्नाटकातील हिंदूंना आवाहन !
-
राज्य सरकारने झटका मांस उपलब्ध करून देण्याचीही मागणी
बेंगळुरू (कर्नाटक) – हलाल मांस प्रक्रियेत प्राण्यांचे मक्केच्या दिशेने तोंड करून कुराणातील वाक्ये वाचून अल्लाला अर्पण केल्यानंतर अमानुषरित्या हत्या करण्याची पद्धत आहे. असे उष्टे मांस पुन्हा हिंदूंच्या देवतांना अर्पण करणे, हे हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे, त्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी हलाल मांसाला विरोध करून झटका मांस (एकाच घावात प्राण्याची हत्या करणे) खरेदी करावे. त्यासाठी सरकारने हिंदूंचे धार्मिक हक्क लक्षात ठेवून राज्यात सर्वत्र झटका मांस मिळेल, अशी व्यवस्था करावी, तसेच हलाल प्रमाणपत्राचा निषेध करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी केली. ते समस्त हिंदु संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कर्नाटक राज्यात काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी मांस खाण्याची प्रथा आहे. या अनुषंगाने हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने वरील आवाहन करण्यात आले आहे. |