नाशिक येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे पिकांची हानी !
नाशिक – येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हाताशी आलेल्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात २ बैल आणि ३ गायी दगावली असून एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे.
अवघ्या १५ मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे कांदा आणि द्राक्षबागा यांची हानी झाली आहे. मका, गहू आणि डाळिंब यांचीही प्रचंड हानी झाली आहे. गारपिटीचा फटका कांद्याच्या पातीवरच बसल्याने त्याची वाढ खुंटू शकते. ‘हानीग्रस्त शेतमालाचा सरकारने त्वरित पंचनामा करून शेतकर्यांना हानीभरपाई मिळवून द्यावी’, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
एका शेतकर्याचा २० एकरवरील बटाटा पूर्णतः खराब झाला आहे. बटाटा हिरवा पडून त्यावर मोड आले आहेत; पण तलाठी किंवा कुणीही सरकारी अधिकारी अद्याप पहाणी करायला आलेले नाहीत.