‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !
वेळेपूर्वीच गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी कारवाई
नगर – रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी संजय गोंदे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ‘बारामती ॲग्रो’चे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर अधिकारी अजय देशमुख यांना २६ डिसेंबरला निलंबितही करण्यात आले होते. कर्जत-जामखेड मधील विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी याविषयी विधान परिषदेमध्ये ‘लक्षवेधी क्रमांक ७’च्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. उसाचा हंगाम चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती.