जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना एकवटल्या !
१६ सहस्र कर्मचारी मोर्च्यात सहभागी
पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या १८ संघटना एकत्रित येऊन त्यांनी १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये १६ सहस्र कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले. ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल कुंभार आणि ‘जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटने’चे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी या मोर्च्याचे नियोजन केले होते.