मिळकतकरातील ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय !

पुणे – मिळकतकरातील ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत १७ मार्च या दिवशी घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत तसा प्रस्ताव ठेवून त्याला तातडीने मान्यता देण्यात येणार आहे. १ ऑगस्ट २०१९ पासून स्वतः वापर करत असलेल्या निवासी मिळकतीची ४० टक्के सवलत काढण्यात येऊ नये, १ एप्रिल २०१० पासूनची देखभाल-दुरुस्ती खर्चाची १५ टक्क्यांहून १० टक्क्यांपर्यंत फरकाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये, या मागण्या मान्य झाल्या आहेत. या निर्णयामुळे अनुमाने १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे. सवलतीची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने होणार असल्याने त्याचा ९९ सहस्र मिळकतधारकांना फटका बसला आहे.