‘शिवभोजना’तील आहार निकृष्ट असल्यास संबंधितांची अनुमती रहित करणार – एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड महापालिका
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – राज्य सरकारने शिवभोजन योजना यापुढेही चालू ठेवली आहे. या योजनेतील आहार निकृष्ट प्रतीचा असल्यास संबंधित उपहारगृहचालकाची अनुमती रहित करण्यात येईल, अशी चेतावणी पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह नेते भाजपचे एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सातारा येथे आले असतांना बोलत होते.
एकनाथ पवार पुढे म्हणाले की, काही ठिकाणी केवळ लाभार्थ्यांचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढून त्यांना शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे. त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी शिवभोजन थाळीसाठी निकृष्ट प्रतीचे अन्न उपयोगात आणले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवभोजन थाळी ही योजना कष्टकरी आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींसाठी आहे. कोणत्याही उपहारगृहचालकाने शिवभोजन थाळीसाठी निकृष्ट प्रतीचे अन्न उपयोगात आणू नये, अन्यथा त्यांची अनुमती रहित करण्यात येईल.