महेंद्रगडमध्ये गोप्रेमींकडून २ घंटे गोतस्करांचा पाठलाग !
गोतस्करांकडून गोप्रेमींवर गोळीबार !
महेंद्रगड (हरियाणा) – येथे गोप्रेमींच्या चार गाड्यांनी २ घंट्यांत ६० किलोमीटरपर्यंत गोतस्करांचा पाठलाग केल्याची घटना नुकतीच घडली. या वेळी गोतस्करांनी ‘पिकअप’ वाहनात कोंबून बांधलेल्या गायींना एक-एक करून त्यांचा पाठलाग करणार्या गोप्रेमींच्या धावत्या गाड्यांसमोर फेकले. या वेळी गोतस्करांनी गोप्रेमींवर गोळीबारही केला. त्यामुळे गोप्रेमींच्या वाहनांची बरीच हानी झाली.
सौजन्य : Amar Ujala Punjab-Haryana
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगडमधील सुरजनवास कालव्याजवळ काही लोक पिकअप वाहनाजवळ संशयास्पद स्थितीत उभे असलेले दिसले. गावातील काही लोकांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामस्थांनी वाहनामध्ये पाहिले असता ८ ते १०गायी दोरीच्या साहाय्याने कोंबून बांधलेल्या त्यांना दिसल्या. गोतस्करीची ही वार्ता आजूबाजूच्या परिसरात पसरली. यानंतर ४ वाहनांतून गोतस्करांचा पाठलाग करण्यात आला. गोप्रेमींनी अनेक वेळा १०० आणि ११२ या क्रमांकांवर दूरध्वनी करूनही त्यांना सहकार्य मिळाले नाही.
संपादकीय भूमिकागोतस्करी रोखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते, ते गोप्रेमी स्वत:चा जीव धोक्यात घालून करावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! |