बलात्काराच्या प्रकरणी तिघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा !
एका वर्षात दिला निकाल !
कलितलाई (मध्यप्रदेश) – येथील जंगलात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी आरोपी शेहबाज, रियाझ आणि मोहसीन यांना श्योपूरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रदीप मित्तल यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यासह प्रत्येक आरोपीला १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वी १७ मार्च २०२२ या दिवशी एका मुलीवर सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. एक वर्षानंतर १७ मार्च २०२३ या दिवशी निकाल देण्यात आला.
सौजन्य आयबीसी 24
१७ मार्च २०२२ या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या ओळखीच्या तरुणासह कलितलाई जंगलातून जात असतांना बाळापुरा येथील रहिवासी शाहबाज, रियाझ आणि मोहसीन तेथे पोचले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी देहात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. अवघ्या १२ दिवसांत पोलिसांनी अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर केला होता. (अशी तत्परता पोलिसांनी सर्वच ठिकाणी दाखवली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे कृत्य करणार्यांवर जरब बसवायची असेल, तर आरोपींना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! |