दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार आकारणार !
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारचा निर्णय !
सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे १० रुपये ‘गोमाता अधिभार’ आकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सरकारला प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
Gomata Cess : हिमाचल प्रदेशमध्ये दारुच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार!https://t.co/BJ88Zib3jf
— ABP माझा (@abpmajhatv) March 17, 2023
संपादकीय भूमिकाअसा अधिभार आकारून पैसे गोळा करण्यासह सरकारने गोरक्षणासाठी विशेष तरतूद करण्याचीही आवश्यकता आहे ! |