सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६५

वैद्य मेघराज पराडकर

‘आजकाल रुग्णाईत व्यक्तीला शहाळ्याचे पाणी दिले जाते. शहाळे, म्हणजे कच्चा नारळ. अपक्व अवस्थेतील कोणतेही फळ हे पचायला जड असते. शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी कफ वाढवते. तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या.