हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी बेळगाव येथे १९ मार्चला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
बेळगाव – हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी बेळगाव येथे १९ मार्चला हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ५.३० वाजता मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्याजवळ, भारतनगर, शहापूर येथे होईल. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी पत्रकार परिषेदत दिली. या प्रसंगी कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि हृषिकेश गुर्जर उपस्थित होते.