शिवराज नाईकवाडे यांच्याकडील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा सचिवपदाचा कार्यभार काढला !
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडील सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढून घेतला आहे. सध्या हा कार्यभार राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
शिवराज नाईकवाडे यांची मुख्य नियुक्ती धर्मादाय आयुक्त कार्यालयात असून देवस्थान समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. गेल्या ८ दिवसांपासून श्री महालक्ष्मी मंदिराच्या मूर्तीच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत विविध वृत्ते प्रसिद्ध होत असून त्या अनुषंगाने ही कार्यवाही झाली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.