‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या निर्मात्यांची सर्व तक्रारी एकत्रित करण्याची मागणी करणारी याचिका निकाली !
सॅनिटरी पॅड्सवर देवतांची चित्रे छापल्याचे प्रकरण
हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून, वस्तूस्थिती लक्षात यावी यासाठी हे चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नवी देहली – सॅनिटरी पॅड्सवर देवतांची चित्रे छापल्याच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी ‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच निकाली काढली. चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक रंजना उपाध्याय अन् संतोष उपाध्याय यांनी ‘या चित्रपटावरून आमच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत’, असा दावा केला होता.
१. उत्तरप्रदेश सरकारने सर्वाेच्च न्यायालयाला सांगितले, ‘याचिकाकर्त्यांच्या विरोधात केवळ एकच ‘प्रथमदर्शनी अहवाल’ (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. इतर तक्रारींवर कोणताही औपचारिक एफ्.आय.आर्. नोंदवण्यात आलेला नाही.’
२. यावर सर्वाेच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी अयोग्य ठरवत त्यांची याचिका निकाली काढली.