आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतांना अणू कार्यक्रमाविषयी तोडजोड करणार नाही ! – पाकिस्तान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतांना अणू कार्यक्रमाच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नाणेनिधीशी जो काही करार होईल, तो सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड केला जाईल. तो लोक पाहू शकतील. अणू कार्यक्रमाशी तडजोड करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे विधान पाकचे अर्थमंत्री इशाक डार यांनी संसदेत खासदार रझा रब्बानी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.
पाकिस्तान कंगाल हो चुका है, मगर उसकी अकड़ अब भी बाकी है. पाकिस्तान के वित्त मंत्री इशाक डार ने कहा कि आईएमएफ से रुके हुए कर्ज को वापस लेने के लिए हम अपने परमाणु कार्यक्रम से कोई समझौता नहीं करेंगे.https://t.co/CbvBus7BQ8
— AajTak (@aajtak) March 16, 2023
अर्थमंत्री इशाक डार पुढे म्हणाले की, आम्ही पाकिस्तान जनतेचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या लोकांच्या हिताच्या रक्षणासाठी सातत्याने काम करत आहोत. नाणेनिधीशी असा कोणताही करार केला जाणार नाही, ज्यामुळे जनतेचे अहित होईल.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी जनतेकडे एक वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे; मात्र तेथील राज्यकर्त्यांना अणूबाँब हवा आहे. जनताही याचा विरोध करत नाही. यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात येते. अशांना कुणी साहाय्य करणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे ! |