कोहिनूर हिरा असणारा राणीचा मुकुट ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये प्रदर्शनात ठेवणार

ब्रिटनच्या राणीचा मुकुट, ज्यावर कोहिनूर हिरा लावण्यात आलेला आहे

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या राणीचा मुकुट, ज्यावर कोहिनूर हिरा लावण्यात आलेला आहे, तो सार्वजनिक प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय हिच्या निधनानंतर राजे चार्ल्स तृतीय यांची पत्नी राणी कंसोर्ट कॅमिला यांच्याकडे हा मुकुट सोपवण्यात आला होता; मात्र त्यांनी हा मुकुट धारण करण्यास नकार दिला होता.

त्यामुळे आता हा मुकुट, अन्य काही शाही आभूषणे, प्रतीक चिन्हे ही लंडनच्या ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासह त्यांचा इतिहासही सांगण्यात येणार आहे. मे मासामध्ये सामान्य नागरिकांना हे प्रदर्शन पहाता येणार आहे.