भाजपकडून २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ होणार !
भाजपकडून २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ होणार !
नवी देहली – भाजप २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एप्रिलमध्ये सुफींचे संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. भाजप मुसलमानांची लोकसंख्या अधिक असलेल्या भागांत सुफींशी संपर्क करणार आहे.
सुफी म्हणजे काय ?
सुफी हा इस्लाम धर्मातील एक संप्रदाय आहे. लोकरीची घोंगडी पांघरून स्वतःच्या विचारांचा प्रचार करणार्या फकिरांना सुफी म्हणतात. इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर हे सुफी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात.