गेल्या ३ वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ४३६ कर्मचार्यांची आत्महत्या !
नवी देहली – गेल्या ३ वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील एकूण ४३६ कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिली. ते म्हणाले की, या आत्महत्या रोखण्यासाठी विविध स्तरांवर पावले उचलली जात असून या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअशांना जीवनाचे महत्त्व आणि त्यातील संकटांना सामोरे जाण्याविषयी शिकवण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवण्यात येईल, त्यामुळे कुणी आत्महत्या करणार नाही ! |