दोषी कपिल कश्यप याला फाशीची शिक्षा !
|
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोषी कपिल कश्यप याला फाशी आणि ६१ सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. घटनेनंतर अवघ्या ६ मासांत हा निकाल लागल्याने मृत मुलीचे पालक आणि नागरिक यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जर अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा मिळत राहिली, तर अशी कृत्ये करण्यास कुणी धजावणार नाही.
मोदीनगर येथे १८ ऑगस्ट २०२२ या दिवशी या मुलीला गावातीलच कपिल कश्यप याने चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून सायकलवर बसवले आणि शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला.
संपादकीय भूमिकाअशा घटनांत अशीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. बलात्काराच्या सर्वच गुन्ह्यांत फाशीचीच शिक्षा होऊ लागली, तर अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही ! |