मध्यप्रदेशात सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर आदिवासींचे पोलीस ठाण्यावर आक्रमण
इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील महूमध्ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर आदिवासींनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. गोळी लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. लोकांनी हत्या झालेल्या मुलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता बंद आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेशकाँग्रेसचे पथक महूमध्ये पोचले असून त्यात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेच्या न्यायदंडाधिर्यांद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. |