हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांनी मंदिरातील शिवलिंगाची केली तोडफोड !
शिवलिंग आणि नंदी पळवले !
हमीरपूर (उत्तरप्रदेश) – येथील बांधुर खुर्द गावाच्या बाहेरील मंदिरातील शिवलिंग आणि नंदी यांची अज्ञातांकडून तोडफोड करून ते पळून नेल्याची घटना घडली. यामुळे गावकर्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या मंदिरात कुणीही पुजारी नियुक्त नव्हता. हे मंदिर गावापासून २०० मीटर दूर होते. याच्या जवळपास कोणतेही घर नव्हते. सकाळी शेतात जाणार्या शेतकर्यांनी मंदिरातील तोडफोड पाहून पोलिसांना ही माहिती दिली.
संपादकीय भूमिकास्वतःच्या श्रद्धास्थानांवर प्रतिदिन आघात होऊनही निद्रिस्त रहाणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्यात आले असते; मात्र हिंदूंच्या संदर्भात ही घटना घडल्याने सर्व जण शांत आहेत ! |