पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार !
नोबेल शांतता पुरस्कार समितीचे स्पष्ट मत
नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध रोखवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांत विश्वासार्ह नेते आहेत अन् ते जगभरात शांतात प्रस्थापित करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांविषयी कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची पुष्कळ आवश्यकता आहे. ते नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत, असे स्पष्ट मत नोबेल शांतता पुरस्कार समितीचे उपनेते असल तोजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. ते सध्या भारताच्या दौर्यावर आहेत.
तोजे पुढे म्हणाले की, भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे योगदान देत आहेत. भारताला शांततेचा वारसा लाभला आहे. त्यामुळे भारत महासत्ता होणार, हे निश्चित आहे.