मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून शिवलिंगावर जलाभिषेक !
पुंछ (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी येथील नवग्रह मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला, तसेच पूजा केली. या मंदिराची निर्मिती करणार्या यशपाल शर्मा यांचा येथे पुतळा बसवण्यात आला आहे. त्यालाही त्यांनी पुष्प अर्पित केले.
मेहबूबा मुफ्ती यांचे नाटक ! – भाजप
या प्रकरणी भाजपचे राज्य प्रवक्ते रणवीर सिंह यांनी टीका करतांना म्हटले आहे की, मेहबूबा मफ्ती नाटक करत आहेत.
(सौजन्य : Republic World)
मेहबूबा आणि त्यांच्या पक्षाने वर्ष २००८ मध्ये ‘अमरनाथ श्राईन बोर्डा’ला भूमी देण्यास विरोध केला होता. या भूमीवर यात्रेकरूंसाठी तात्पुरते तंबू बांधण्यात येणार होते; मात्र मेहबूबा यांनी बोर्डाला तात्पुरत्या काळासाठी भूमी हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. जलाभिषेकेच्या नाटकबाजीतून काहीही साध्य होणार नाही. जर अशी नाटकबाजी पालट करू शकत असती, तर राज्यात समृद्धी आली असती.
मेहबूबा मुफ्ती यांची कृती इस्लामविरोधी ! – मौलाना (इस्लामचे अभ्यासक) असद कासमी
मेहबूबा मुफ्ती यांना देवबंद (इस्लामी संस्था) कडूनही विरोध करण्यात आला आहे. देवबंदचे मौलाना असद कासमी यांनी म्हटले की, मेहबूबा यांनी जे काही केले, ते योग्य नाही. ते इस्लामच्या विरुद्ध आहे. (निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी अशांना धर्मनिरपेक्षतेचे डोस न पाजल्याचाच हा परिणाम आहे ! आता तरी त्यांना हा डोस पाजण्यात येईल का ? कि केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करत आत्मघात करून घेत रहायचा ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|