तरुणीकडून बलपूर्वक वेश्याव्यवसाय करवून घेणार्यांना जन्मठेपेची शिक्षा
ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – एका तरुणीवर बलात्कार करून तिला वेश्याव्यवसाय करायला लावल्याच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने ३ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासह प्रत्येकाला १ लाख ८ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्काम न भरल्यास प्रत्येकी ६ मास अधिक कारावास भोगावा लागणार आहे.
Uttar Pradesh: बलात्कार एवं देह व्यापार के जुर्म में तीन लोगों को उम्रकैद https://t.co/CBpx82QuOZ #prabhasakshinews
— Prabhasakshi (@prabhasakshi) March 16, 2023
एका महिलेने पीडित तरुणीला ईशान्य भारतात नोकरीचे आमीष दाखवून देहलीत आणले होते.तेथे तिला समीर उपाख्य मकसूद याच्या हरियाणातील फरीदाबाद येथील घरी बांधून ठेवण्यात आले. यात ओमकार क्षत्रिय आणि अनूप गुप्ता हेही सहभागी होते. नंतर त्यांनी तिच्याकडून वेश्यव्यवसाय करवून घेतला आणि स्वतःही तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या कह्यातून पळून जाऊन तिने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाअशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक ! |