अभिनेते रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना बाहेर जातांना समवेत नेतात छोटे मंदिर !
देवावरील अशी श्रद्धा किती चित्रपट अभिनेत्यांमध्ये आहे ?
नवी देहली – दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना बाहेर जातांना समवेत छोटे मंदिर ठेवतात. ‘यातून आम्हाला ऊर्जा मिळत असून भारताशी जोडून रहाण्याची प्रेरणा मिळते’, असे या दोघांनी म्हटले आहे.
(सौजन्य : hithokthi)
जुनियर एन्टीआर् आणि रामचरण यांचा अभिनय असणार्या ‘आर्आर्आर्’ या चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला वर्ष २०२३ चा ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ‘वैनिटी फेयर’ नावाच्या नियतकालिकाने रामचरण यांच्या घराची चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यात रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी सिद्ध होत असल्याचे दिसत आहेत. यात रामचरण यांनी म्हटले, ‘‘कुठेही गेलो, तरी मी आणि माझी पत्नी नेहमीच आमच्या समवेत लहान मंदिर ठेवतो. आम्ही दिवसाचा प्रारंभ प्रत्येक गोष्ट आणि व्यक्ती यांच्याविषयी आभार व्यक्त करून करतो, ज्यांच्यामुळे आज आम्हाला हे यश मिळाले आहे.’’