सोलापूर विद्यापिठाचे अंदाजपत्रक सादर होत असतांना अभाविपकडून घोषणाबाजी !
विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे वार्षिक अंदाजपत्रक १५ मार्चला दुपारी सादर करण्यात आले. विद्यापिठाच्या मुख्य सभागृहात अंदाजपत्रक सादर होत असतांना सभागृहाच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच अंदाजपत्रकाविषयी निषेधही नोंदवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराच्या बाहेर नेले.