उन्हाळ्यात पालापाचोळ्याची साठवणूक करून ठेवावी !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९७
‘मार्च-एप्रिल या मासांत झाडांखाली पडलेला पालापाचोळा सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. या दिवसांत आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार शक्य तेवढा पालापाचोळा साठवून ठेवावा. असे केल्याने पुढे जून मासापासून पावसाला आरंभ झाल्यावर आपल्याला साठवलेला पालापाचोळा वापरता येतो.
आपल्याकडील लागवडीमध्येही सर्वत्र पालापाचोळ्याचे जाड आच्छादन करावे. (पालापाचोळ्याने भूमी झाकावी.) त्यामुळे कडक उन्हापासून मातीचे रक्षण होते अन् ओलावा टिकून रहाण्यास साहाय्य होते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (४.३.२०२३)
‘पालापाचोळा न जाळता झाडांच्या संवर्धनासाठी त्याचा कसा उपयोग करावा ?’ याविषयी विस्तृत माहिती देणारा लेख वाचण्यासाठी पुढील मार्गिका पहावी. : bit.ly/3LnEOlM |
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
lagvadseva@gmail.com