क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पोलिसांना निवेदन !
असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
सातारा, १५ मार्च (वार्ता.) – सामाजिक प्रसारमाध्यमांवरून क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण रोखण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुुस्थानच्या पुसेसावळी विभागाच्या वतीने औंध पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री सोमनाथ अटकेकर, प्रसाद गाढवे, आदिनाथ राऊत, आदित्य देशमाने, संदीप राक्षे, अनिकेत गाढवे, सूरज राक्षे, गणेश देशमाने, प्रकाश माळी, सागर भगत आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या नावे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, ११ मार्च २०२३ या दिवशी वडूज येथील साद सज्जद शेख याने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून भारताच्या इतिहासातील क्रूरकर्मा, कपटी, मोघल शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करणारे ध्वनीचित्रीकरण सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदानदिन ११ मार्च या दिवशी होता. सकल हिंदु समाजाच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी हा प्रकार मुद्दाम करण्यात आला. यामुळे साद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाजात चुकीचा संदेश प्रसारित होऊ शकतो, तसेच पोलिसांनी याविषयी तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाक्रूरकर्मा औरंगजेब आणि मोगल आक्रमक यांचे गुणगान करणार्यांना भारतातून हाकलून लावा ! |