‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’ यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ‘ई-रुग्णवाहिका’ प्रदान !
कोल्हापूर, १५ मार्च (वार्ता.) – ‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’ यांच्या वतीने, तसेच ‘इनरव्हिल क्लब डिस्ट्रिक्ट ३१७’ यांच्या सहयोगाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ‘ई-रुग्णवाहिका’ प्रदान करण्यात आली. या प्रसंगी ‘इनरव्हिल क्लब’च्या अध्यक्षा महानंदा चंदरगी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, ‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’चे संग्राम पाटील, गौरव पाटील, डॉ. लोकरे, विद्या पठाडे, पल्लवी मूग, तसेच अन्य उपस्थित होते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा परिसर मोठा असल्याने रुग्णांना ने-आण करण्यास अडचणी येत होत्या. या रुग्णवाहिकेमुळे पुष्कळ मोठे साहाय्य होणार आहे. अशा प्रकारची आणखी एक रुग्णवाहिका मिळावी, अशी मागणी डॉ. प्रदीप दीक्षित यांनी या प्रसंगी केली.