कसबा (संगमेश्वर) येथील श्री कर्णेश्वर मंदिरात नयनरम्य किरणोत्सव !
संगमेश्वर – तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभार्यातील शिवपिंडीवर १४ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता सूर्यकिरण आल्यामुळे भक्तगणांना किरणोत्सवाचा आनंद लुटता आला. गाभार्यात सर्वत्र पसरलेला सूर्यदेवाच्या सोनेरी प्रकाशाचा नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात सूर्य मावळतीला गेल्यानंतर किरणोत्सव होतो; मात्र कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने येथे सूर्योदयालाच किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा पहायला मिळतो. सुमारे १० ते १२ मिनिटे हा सोहळा अनुभवता आला.