‘गझवा-ए-हिंद’वर शिक्कामोर्तब !
भारतात गेल्या वर्षी दोन दूरगामी ‘ब्लू प्रिंट’ (नियोजन आराखडा) सिद्ध करण्यात आल्या. वर्ष २०४७ मध्ये म्हणजे स्वतंत्र भारताच्या शताब्दीपूर्तीपर्यंत भारताने विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेण्यासाठी काय करायला हवे ? याची ‘फ्युचर रेडी इंडिया’ या योजनेच्या नावाखाली केंद्रशासनाने सिद्ध केलेली पहिली ‘ब्लू प्रिंट’ ! जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्या याच भारत देशाला पुढील २५ वर्षांत इस्लामी राष्ट्र घोषित करण्याचे मनसुबेही आखले जात आहेत. अन्वेषण यंत्रणांना हे लक्षात आल्यावर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या षड्यंत्रकर्त्या जिहादी संघटनेवर गतवर्षी प्रतिबंध घालण्यात आला. पी.एफ्.आय.च्या २ आतंकवाद्यांकडून भारताला इस्लामी राष्ट्र घोषित करण्याची ‘इंडिया २०४७ : टूवर्ड्स रूल ऑफ इस्लाम इन इंडिया’ नावाची ती दुसरी ‘ब्लू प्रिंट’ ! ती हस्तगत केल्यावर पी.एफ्.आय.च्या षड्यंत्राचा भांडाफोड झाला होता. यातून भारतियांना देशाला कुठे न्यायचे आहे आणि त्याच्याच राष्ट्रद्रोही नागरिकांना त्याला कुठे नेऊन ठेवायचे आहे, हे लक्षात येते. आता ‘एन्.आय.ए.’ने या दुसर्या ‘ब्लू प्रिंट’च्या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट करून या विषयावर शिक्कामोर्तब केले आहे. थोडक्यात भारताला ‘गझवा-ए-हिंद’ करण्याच्या धर्मांध मुसलमानांच्या १ सहस्र वर्षांपासूनच्या प्रयत्नांवर आता लोकशाहीने शिक्कामोर्तब केले आहे !
भारताचे इस्लामीस्तान !
गत २-३ वर्षांत भारत जसजसा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या बळावर सरशी घेऊ लागला, तसतसे या देशातील अनेक मुसलमानांना असुरक्षित वाटून त्यांनी त्यास विरोध करण्यास आरंभ केला. आरंभी या वैचारिक संघर्षाने पुढे रक्तरंजित लढ्याचे रूप घेतले. काशी विश्वनाथावर हीन पातळीला जाऊन टिप्पणी करणार्या एका मौलानाच्या विरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा इस्लामी जगताकडून निषेध करण्यात आल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल. या वक्तव्यावरून काफिर हिंदूंचे शिर धडापासून वेगळे करण्याच्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत देशातील कानाकोपर्यांतून आंदोलने काढली गेली. अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करण्यापासून सरकारी संपत्तीची जाळपोळ, हानी करण्यात आली. अनेक मुसलमान देशांनी चक्क सरकारी स्तरावर भारत शासनाला नूपुर शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली. या चिथावणीपायीच राजस्थानच्या उदयपूरच्या कन्हैयालालपासून अमरावतीच्या डॉ. कोल्हे यांच्यापर्यंत अनेकांचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले. या कृत्याचे धागेदोरे पाकिस्तान येथील ‘दावत-ए-इस्लामी’पर्यंत पोचले. दुसरीकडे बिहारच्या फुलवारी शरीफ येथे अनेक राज्यांतील धर्मांध मुसलमानांना प्रशिक्षण देणार्या आणि भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आखणार्या ‘पी.एफ्.आय.’च्या दोघांना अटक करण्यात आली. या एकूण प्रकरणांतून बहुसंख्यांक हिंदू आणि त्यांचा भारत यांना नष्ट करण्याचे कुटील डाव लक्षात येतात.
गांधी हेच धोकादायक !
भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी होत असलेले प्रयत्न जिवाचा थरकाप उडवणारे असले, तरी भारताची नाचक्की करून ब्रिटनहून परतलेल्या काँग्रेसच्या राजकुमारांना भारतीय लोकशाही ही या कारणामुळे धोक्यात आल्याचे कधीच का वाटले नाही ? इस्लामिक स्टेटची कृत्ये असोत कि मध्ययुगीन कालावधीत काफिरांच्या हत्यांचे प्रकार असोत, तेच आज भारतातील हिंदूंना सहन करावे लागत आहे, याचा गांधींना कोणताच उमाळा का आला नाही ? त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असण्यामागील खरे कारण हे भारताला गझवा-ए-हिंद बनवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न आणि ते प्रयत्न करणार्यांना पाठीशी घालणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते आहेत, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. ‘एन्.आय.ए.’च्या आरोपपत्रातून हे स्पष्ट झाले आहे, एवढेच ! ‘पुरेशा पुनरावृत्तीने आणि संबंधित लोकांची मानसिकता ओळखून ‘एखादा चौकोन हा वर्तुळ आहे’, हे सिद्ध करणे अशक्य नाही. हे केवळ शब्द असतात आणि त्यांच्या आडून कल्पना अन् (खोटेपणाचा) वेश सिद्ध करता येतो’, या जोसेफ गोबेल्सच्या रणनीतीचा वापर करणार्यांशी त्यामुळे आता दोन हात करण्याची वेळ आली आहे. साम्यवादी, धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी यांसारख्या ‘तुकडे तुकडे गँग’चा यांत समावेश असून ‘एन्.आय.ए.’च्या आरोपपत्रावर यांची भयाण शांतता देशाच्या मुळावर उठणारी आहे.
मदरशांना टाळे ठोका !
पी.एफ्.आय.चे मनसुबे स्पष्ट झाले, त्यांच्यावर बंदी घातली, एवढ्यावर भारत शासनाने समाधान मानणे आत्मघात ठरेल. आजची पी.एफ्.आय. ही २० वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या ‘सिमी’चेच नवरूप होते, नव्हे, तर आहे. याचे कारण अजूनही त्यांचे काम चालू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले, तर उद्या म्हणजे आणखी २०-२५ वर्षांनी हीच ‘इस्लामी भारता’ची चळवळ सत्यात उतरणार आहे. हे होऊ नये, यासाठी सरकारला येत्या काळात आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. जिहादी आतंकवादाचे बाळकडू हे बहुतांश वेळेला मदरशांमधूनच दिले जात असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर कराची येथील जमशेद शहराचे माजी महापौर राहिलेले इंग्लंड येथील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांचे विचार दिशादर्शक आहेत. त्यांच्या मते भारतीय मदरशांमध्ये ८५ टक्के बहुसंख्यांकांच्या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्यामुळे ज्या प्रकारे सौदी अरेबियामध्ये एकही मदरसा नाही, त्या प्रकारेच भारतातील सर्व मदरशांवर बंदी घालणे आवश्यक आहे. अजाकिया यांचे हे विचार लक्षात घेतले, तरच भारत गझवा-ए-हिंदच्या धोक्यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !
भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ होऊ द्यायचे नसेल, तर देशातील सर्व मदरशांवर बंदी घालणे काळाची आवश्यकता ! |