शासकीय डॉक्टरांच्या निवासासाठी १० सहस्र खोल्यांची आवश्यकता !
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – राज्यात शासकीय डॉक्टरांच्या निवासासाठी वसतीगृह अल्प पडत आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही वसतीगृह अपुरी पडत असल्याचा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर राज्यात निवासी डॉक्टरांसाठी १० सहस्र खोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी १४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. डावखरे यांनी जे.जे. रुग्णालयातील वसतीगृहाच्या दूरवस्थेचा प्रश्न उपस्थित केल्यावर १७ कोटी रुपये संमत केल्याचे महाजन यांनी सांगितले. महापालिकेच्या निवासी डॉक्टरांना १ लाख रुपये मानधन मिळते; मात्र राज्य शासकीय निवासी डॉक्टरांना ६५ रुपये दिले जातात. त्यात १० सहस्र रुपये वाढतील.