मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या ९ मासांत पूर्ण होईल ! – रवींद्र चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता; परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच शासनाची भूमिका आहे. येत्या ९ मासांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १३ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.
सदस्या अदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.