मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक समाजासाठी काम केले पाहिजे ! – ऑल इंडिया मुस्लिम जमात
लक्ष्मणपुरी – राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र योगी आदित्यनाथ एका उत्तरदायी पदावर बसले आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शपथ घेतांना सर्वांना न्याय देण्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी एका विशेष समाजासाठी काम करतांना अन्य समाजांसाठीही काम केले पाहिजे. तरच लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल, अशी प्रतिक्रिया ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयावर व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिका
|