श्री. गुणवंत दुर्गे (वय ५८ वर्षे) यांच्या गंभीर आजारपणात त्यांची मुलगी कु. यामिनी दुर्गे हिला शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘म्युकरमायकोसिस’सारखा गंभीर आजार (काळ्या बुरशीमुळे होणारा आजार) होऊनही वडिलांनी रुग्णालयात भरती होतांना सहजपणे चालत जाणे
‘माझ्या बाबांना ‘म्युकरमायकोसिस’ (काळ्या बुरशीमुळे होणारा रोग) हा गंभीर आजार झाला होता. त्यांना डोके दुखणे आणि डोळे अन् कपाळ यांवर सूज येणे असा त्रास होत होता. तरीही त्यांना रुग्णालयात भरती करतांना ते सहजपणे चालत जाऊ शकले. रुग्णालयातील कर्मचार्यांना त्यांचा आजार कळल्यावर ते त्यांना नेण्यासाठी ‘स्ट्रेचर’ घेऊन आले; परंतु बाबा आधुनिक वैद्यांकडे सहजपणे चालत गेले.
२. अपेक्षित अशा शल्यविशारद वैद्यांना विनंती केल्यावर ते शस्त्रकर्म करण्यास सिद्ध होणेे
बाबा ज्या रुग्णालयात भरती होते, तेथे दोन ‘न्यूरो सर्जन’ (Neurological surgeon) होते. त्यांच्यापैकी एका आधुनिक वैद्यांना आम्ही बाबांना दाखवले; परंतु बाबांना मात्र तेथील दुसर्या आधुनिक वैद्यांकडून शस्त्रक्रिया करून हवी होती. त्यासाठी तेथील व्यवस्थापन आरंभी ऐकत नव्हते. त्यांच्या नियमाप्रमाणे एका आधुनिक वैद्यांनी रुग्णाला पडताळले, तर पुन्हा दुसर्या आधुनिक वैद्यांकडे पडताळणीसाठी जाता येत नाही. त्या वेळी मी दुसर्या आधुनिक वैद्यांना विनंती केल्यावर ते बाबांचे शस्त्रकर्म करण्यास सिद्ध झाले.
३. शस्त्रकर्म केल्यावर वडिलांना पुष्कळ जंतूसंसर्ग होऊन तो मेंदूपर्यंत पोचल्याचे आधुनिक वैद्यांच्या लक्षात येणे आणि तो वाढू नये, यासाठी त्यावरील पुष्कळ ‘इंजेक्शन्स’ घेण्याची आवश्यकता असणे
बाबांचे ‘Craniotomy’ हे (मेंदूच्या कवटीच्या आतील दाबाच्या संदर्भात केलेले) शस्त्रकर्म करण्यात आले. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘यांना सर्वांत अधिक जंतूसंसर्ग (Infection) झाला आहे. मी आजवर एवढा जंतूसंसर्ग झाल्याचे कुणाला पाहिले नाही. हा संसर्ग (Fungal Infection) मेंदूपर्यंत पोचला आहे. जर त्यांना संसर्गरोधक ‘इंजेक्शन्स’ (Antifungal Injections) नियमित आणि वेळेत मिळाली नाहीत, तर शस्त्रकर्म करून काहीच उपयोग होणार नाही.’ त्या वेळेस त्या ‘इंजेक्शन्स’ची सर्वत्र पुष्कळ कमतरता होती. बाबांना अशी १६० ‘इंजेक्शन्स’ द्यायची होती; पण गुरुकृपेने बाबा १६० ऐवजी १२० ‘इंजेक्शन्स’ घेतल्यावरच बरे झाले.
४. महाग आणि तुटवडा असणारी ‘इंजेक्शन्स’ वेळेवर मिळाल्यामुळे बाबा आजारातून एक मासात बरे होणे
बाबांना द्यावे लागणारे एक ‘इंजेक्शन’ ६ सहस्र रुपयांचे होते. अशी ६ ‘इंजेक्शन्स’ प्रतिदिन द्यायची होती, तसेच त्यांची बाजारात कमतरताही होती. त्यामुळे या ‘इंजेक्शन्स’चा काळाबाजार चालू होता. एका ‘इंजेक्शन’ला काळाबाजारात १७ सहस्र रुपये द्यावे लागले. हा व्यय अनुमाने २० लाख रुपयांचा होता. बाबांनी याविषयीचे आर्थिक नियोजन आधीच करून ठेवले होते. नातेवाइकही त्यांना वेळोवेळी साहाय्य करत होते. यामुळे बाबा या आजारातून एका मासात बरे झाले.
५. गुरुमाऊलींच्या कृपेने योग्य आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे बाबांना गंभीर आजारातून बाहेर पडता येणे
हे सर्व गुरुमाऊलींच्याच कृपेने शक्य झाले. हे सर्व गुरुमाऊलींचे नियोजन होते. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी आर्थिक दृष्ट्या साहाय्य मिळाले. बाबांनी जी काही बचत करून ठेवली होती, ती गुरुमाऊलींनीच त्यांना सूक्ष्मातून सुचवली होती. बाबांना योग्य आधुनिक वैद्यांच्या उपचारांची सोयही गुरुमाऊलींनीच केली होती. केवळ आणि केवळ गुरुमाऊलींमुळेच बाबा या गंभीर आजारातून बाहेर पडले.
बाबांचा हा पुनर्जन्मच झाला असावा. गुरुमाऊलींनीच बाबांना जीवनदान दिले. यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
कु. यामिनी गुणवंत दुर्गे ,वर्धा (१८.११.२०२१)
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |