शांत निद्रेसाठी, तसेच केसांच्या आरोग्यासाठी प्रतिदिन झोपतांना डोक्याला तेल लावा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६२
बर्याच जणांना रात्री लवकर झोप न लागणे, तसेच मध्ये जाग आली, तर पुन्हा झोप न लागणे यांसारखे त्रास असतात. प्रतिदिन रात्री झोपतांना डोक्याला तेल लावल्यास हा त्रास बरे होण्यास साहाय्य होते. २०० मि.लि. खोबरेल तेलामध्ये साधारण १० ग्रॅम भीमसेनी कापूर घालावा. प्रतिदिन रात्री झोपतांना उजव्या तळहातावर या तेलाचे २ थेंब घ्यावेत. डाव्या करंगळीने हे तेल दोन्ही कानांना आतून लावावे. मग डाव्या तळहातावर थोडे तेल घ्यावे. यात उजवी करंगळी बुडवून दोन्ही नाकपुड्यांना आतून तेल लावावे. उरलेले तेल डोक्याला, म्हणजेच केसांच्या मुळांशी लावावे. असे केल्याने शांत झोप लागते, तसेच केसांचेही चांगले पोषण होऊन केस गळायचे थांबतात. (डोक्याचे तेल अंथरुणाला लागू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.)’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)
या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या |