(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !
जयपूर (राजस्थान) – काँग्रेसच्या नेत्यांनी गटबाजी संपवली पाहिजे. देश वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले पाहिजे. मोदी संपले तर, भारताची भरभराट होईल अन्यथा देश उद्ध्वस्त होणार आहे. आपली लढाई अदानी यांच्याशी नसून भाजपाशी आहे. भाजपला संपवले, तर अदानी आणि अंबानी हेही संपतील, असे विधान काँग्रेसचे राजस्थानचे दायित्व असणारे सुखजिंदर सिंह रंधावा यांनी केले. या विधानावर भाजपने टीका केली आहे.
Talk about 'finishing off Modi', Congress leader tells party workers https://t.co/Wu3LTgoO7m
— TOI Cities (@TOICitiesNews) March 14, 2023
भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी म्हटले की, काँग्रेसने पुन्हा एकदा सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मोदी यांना संपवण्यासाठी काँग्रेस लोकांना भडकवत आहे. काँग्रेस आता रंधावा यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार ? कि बक्षीस देत त्यांच्या विधानाचे समर्थन करणार?, असा प्रश्न पुनावाला यांनी उपस्थित केला.
(सौजन्य : Oneindia Hindi | वनइंडिया हिंदी)
संपादकीय भूमिकाजनतेने काँग्रेसलाच राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पुढे राजकीयदृष्ट्या पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल, हे कुणीही नाकारू शकत नाही. |