आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे कर्नाटकात विधान !
कगिरी (कर्नाटक) – आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.
‘We do not need Babri Masjid…’: #Assam CM #HimantaBiswaSarma slams #RahulGandhihttps://t.co/xiK52p48Qg
— DNA (@dna) March 14, 2023
लंडन येथील कार्यक्रमात भाजपवर टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु मला त्यांना सांगायचे आहे की, नरेंद्र मोदी असेपर्यंत ते कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’साठी कर्नाटकचा दौरा करतात आणि लंडनला जाऊन ‘भारत तोडो’ची भाषा करतात.