गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता
पणजी, १३ मार्च (वार्ता.) – हवामान खात्याने १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाट चालू असतांना मोकळ्या जागेत राहू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
Monsoon: गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता… #dainikgomantak #dainikgomantaknews #monsoon #Goa #weather https://t.co/XFz9LP7tli
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) May 24, 2021
गेले २ आठवडे गोव्यात कडक उष्मा जाणवत आहे. आता हवेत बाष्पही निर्माण झाले आहे. राज्यात १३ मार्चला कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसहून अधिक होते.