राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केल्याचे विधानमंडळाकडून परिपत्रक !
उपसभापतींकडून परिपत्रक रहित !
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे परिपत्रक विधीमंडळाच्या सचिव कार्यालयाकडून काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी १३ मार्च या दिवशी हे परिपत्रक सभागृहात वाचून दाखवले. सचिव कार्यालयाकडून झालेली ही चूक लक्षात येताच उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी हे परिपत्रक रहित केले.
संपादकीय भूमिकाअशा हास्यास्पद गंभीर चुका करणारे प्रशासन राज्यकारभार कसा करत असेल, याची कल्पना येते ! |