मुंबईत मार्चच्या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !
मुंबई – मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्या शेवटी होणार आहे. बैठकीच्या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
गेल्या बैठकीच्या वेळी परिषदेला उपस्थित रहाणार्या परदेशातील सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील रस्ते तातडीने स्वच्छ करण्यात आले होते. बैठकांच्या ठिकाणच्या रस्त्यांवरही रोषणाई केलेली होती. या वेळीही ‘संबंधित मार्गांवर रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत’, असे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले. अभ्यागतांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी, आदी सूचनाही दिल्या. सर्व कामांची पहाणी आणि रंगीत तालीम २५ मार्चला असेल.