वेदनेविना हत्या !
‘अमेरिका आणि ऑस्टे्रलिया यांसारख्या प्रगत देशांत भटकी कुत्री सापडल्यास त्यांना सरकारी आश्रयस्थानांत नेण्यात येते. अमेरिकेत अशी साडेतीन सहस्र आश्रयस्थाने असून त्यांवर प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ७२ घंट्यांत कुणी आश्रयस्थानांतील कुत्र्यांना पाळण्यासाठी नेले नाही, तर त्या कुत्र्यांची वेदनेविना चक्क हत्या करण्यात येते. एका अंदाजानुसार अमेरिका एका वर्षात साधारण ४ लाख कुत्र्यांना अशा प्रकारे मारते, तर ऑस्ट्रेलियात हा आकडा २ लाख आहे. भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्या या समस्येवर प्राण्यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्यकता आहे. प्राण्यांप्रतीची ‘दिशाहीन दया’ जर मनुष्याच्या जिवावर बेतत असेल, तर ती काय कामाची ? हे लक्षात घेतले, तरच त्या सिरोहीच्या दुर्दैवी आईच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याचे पुण्य आपल्याला लाभेल.’ (२.३.२०२३)