बावधन (जिल्हा सातारा) येथील भैरवनाथाच्या बगाड यात्रेला छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती !
सातारा – जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनमधील भैरवनाथाच्या बगाड यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘बगाड’ म्हणून बावधनचे ‘बगाड’ प्रसिद्ध आहेत. बगाड पहाण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये उपस्थित झाले आहेत. या यात्रेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही १२ मार्चला उपस्थिती दर्शवली. ‘ज्या पद्धतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहाणे आवश्यक आहे, तरच या भागाचे कल्याण होईल. या भागाचे कल्याण व्हावे’, ही मागणी मी देवाकडे मागितली आहे, असे छत्रपती उयदनराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले.