पेला, वाटी यांसारखी छोटी भांडी झाकण्यासाठी वापरावयाचे झाकण योग्य मापाचे वापरा !
‘पेला, वाटी यांसारखी भांडी लहान झाकणाने झाकतांना ते योग्य मापाचे असल्यास, ते हाताळणे सोपे जाते. त्यावरील झाकण लहान असल्यास ते थोडे उघडे राहून पदार्थ थंड होतात किंवा त्यावर धूळ बसू शकते. तसेच झाकण भांड्यापेक्षा थोडेतरी मोठे असल्यास भांडे वरून उचलतांना केवळ झाकणच हातात येते. असे होऊ नये, म्हणून भांड्यावर झाकण ठेवतांना ते बरोबर त्या मापाचे असावे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.२.२०२३)