प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता ! – पाकचे माजी अर्थमंत्री
इस्लामाबाद (पाकिस्तान) – प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत पाकचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी ‘पाकिस्तानची पुनर्कल्पना’ या परिसंवादाला संबोधित करतांना मांडले. ते म्हणाले की, भारत, बांगलादेश आणि इतर इस्लामिक देश यांमध्ये जन्मदर पाकच्या तुलनेत पुष्कळ अल्प आहे. पाकिस्तानातील जन्मदर जगात सर्वांत अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.
पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री असलेले इस्माइल पुढे म्हणाले,
१. पाकिस्तानात विकासासाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला गेला पाहिजे. पाकिस्तानातील ५० टक्के मुले शाळेत शिकत नाहीत.
२. पाकिस्तानातील केवळ ४४ टक्के मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात, तर भारतात हे प्रमाण ८५ टक्के आहे.