सिंधुदुर्ग : आरोस आणि सोनाळी येथे वणव्यामुळे हानी
सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील आरोस आणि वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे ११ मार्च या दिवशी लागलेल्या वणव्यामुळे हानी झाली.
सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस-आरोस डोंगरावरील अनुमाने २ हेक्टर वनक्षेत्रात अचानक आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वनविभागाचे अधिकारी यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी काही प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली; मात्र जवळील आंबा आणि काजू बागायती वाचवण्यात यश आले. येथील जंगलात ४ दिवसांत दुसर्यांदा आग लागण्याचा प्रकार घडला आहे.
वणव्यामुळे झाड पडून वैभववाडी-उंबर्डे रस्त्यावरील वाहतूक ठप्प
वैभववाडी – तालुक्यातील सोनाळी येथे ११ मार्चला सायंकाळी लागलेल्या आगीत ‘आकेशिया’चे झाड आणि बांबूचे बेट जळून रस्त्यात उन्मळून पडले. यामुळे वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील वाहतूक तब्बल १ घंटा ठप्प झाली होती. संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या साहाय्याने झाड बाजूला केले. त्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत् झाली.