बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात ६ जण ठार !
बुलढाणा – समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा) या मार्गावरील लोणार तालुक्यातील शिवणी पिसाजवळ चारचाकीचा भीषण अपघात झाला. यात ६ जण जागीच ठार झाले, तर ६ जण गंभीर घायाळ झाले आहेत. बहुतांश घायाळ, तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगर येथील एन्-११ मधील रहिवाशी आहेत.
समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगर येथून शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव इर्टिगा कारला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन कुटुंबांतील 6 जण जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. https://t.co/Nv9TibWGUM
— Saamana (@SaamanaOnline) March 13, 2023
हा अपघात १२ मार्च या दिवशी सकाळी झाला. चारचाकी वाहन हे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ‘डिव्हायडर’मध्ये घुसून ३-४ पलट्या मारून दुसर्या बाजूच्या रस्त्यावर उलटले. या वाहनामध्ये जवळपास १३ जण होते. यात काही लहान मुलांचाही समावेश होता. वाहनाच्या मालकाचे नाव सुरेश बर्वे हे असून ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.