(म्हणे) ‘आम्ही गायीचे दूध पितो, तर भारतीय मूत्र !’-पाकिस्तानी
पाकिस्तानी नागरिकाचा हिंदुद्वेष !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झालेली असतांना तेथील काही नागरिकांना भारताविषयी प्रेम निर्माण झाले आहे, तर काहींमध्ये भारतद्वेष तीव्र असल्याचे दिसून येत आहे. यू ट्यूबवर व्हिडिओ प्रसारित करणार्यांपैकी एकाने असा एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ ‘पाकिस्तान अनटोल्ड’ (अप्रसारित) या टि्वटर खात्यावरून प्रसारित करण्यात आला आहे. यात ‘आम्ही गायीचे दूध पितो, तर ते गोमूत्र पितात. तुम्ही त्यांच्याशी आमची तुलना करणार का ? ते दगडाला देव मानतात, तर आम्ही अल्लाला मानतो’, अशी विधाने एक पाकिस्तानी नागरिक करत असल्याचे दिसत आहे.
१. व्हिडिओ बनवणारा एका पाकिस्तानी नागरिकाला विचारतो, ‘तुम्ही भारत पाहिला आहे का ?’ तेव्हा तो म्हणतो, ‘तुम्ही पाहिला आहे का ? मी भारताचे शहर पाहिले आहे. तेथे लोक पदपथावर रिकाम्या पोटी झोपतात. तुम्ही येथे असे कुणी करतांना दिसतांना दाखवू शकलात, तर मी तुम्हाला मानेन. भारत आणि पाक यांच्यात पुष्कळ भेद आहे.’
२. यावर व्हिडिओ बनवणारा म्हणतो की, आपण भारताला वाईट म्हणू शकत नाही. त्यावर ती व्यक्ती म्हणते की, जगभरात मुसलमानांची लोकसंख्या २०० कोटी आहे. मुसलमान आणि इमान (प्रमाणिकपणा) कधीही नष्ट झालेले नाही आणि होणारही नाही. मग भारत काहीही करू देत.
पाकिस्तानच्या तज्ञाकडून भारताचे कौतुक !
पाकिस्तानचे परराट्र धोरणाचे तज्ञ उजैर यूनुस नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी म्हटले आहे की, भारताशी बरोबरी करणे कठीण आहे. मी जेव्हा भारतात पाऊल ठेवले, तेव्हा मला वाटले की, मी भविष्यात आलो आहे. पाकिस्तानी सत्ताधार्यांनी भारताच्या विरोधात द्वेष पसरवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवल्या आहेत.
-विख्यात #पाकिस्तान विदेश नीति विशेषज्ञ उज़ैर यूनुस: हाल ही में देश की यात्रा के दौरान भारत में डिजिटल पदचिह्न को देखते हुए मुझे ऐसा लगा जैसे मैं भविष्य से किसी राज्य का दौरा कर रहा हूं
-पाकिस्तानियों को “राजनीति की खातिर भारत के खिलाफ नफरत का झूठ” खिलाया जा रहा है। pic.twitter.com/ScWwqGGp5C— Sainidan Ratnu..Retd. Judicial Officer (@sainidan_ratnu) March 11, 2023
संपादकीय भूमिका‘गाढवाला गुळाची चव काय?’ अशी म्हण अशांना चपखल लागू पडते ! अशांना गोमूत्राचे लाभ माहिती असते, तर त्यांनी असे विधान कधीच केले नसते ! गोहत्या करणार्यांना गोमातेचे लाभ ठाऊक झाले, तर तेही तिची पूजा करू लागतील; मात्र आसुरी वृत्तीच्या लोकांकडून ते कदापि शक्य नाही ! |